रामदासपेठ पोलीस ठाणे परिसरात मध्यरात्री दोन हत्या झाल्याने खळबळ!
अकोला – शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे. शहरात खून, लुटमार, चोरीच्या घटना थांबत थांबत नाहीत. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती नसल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या गस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गजबजलेल्या परिसरात रेल्वेच्या ठिकाणी खुनाच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. अकोला शहरात मध्यरात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हत्तेमुळे च्या घटनेने अकोला शहर हादरले आहे. या दोन्ही घटनांतील आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे.
पहिली हत्ते ची घटना – रेल्वे स्टेशनच्या मुख्य चौकातील गुजराती हॉटेलवर घडली या हत्येमध्ये अकोट गळती संकुल, अण्णाभाऊ साठे नगर येथील अतुल रामदास थोरात या ४० वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आणि दुपारी दीडच्या सुमारास अतुल त्याच्या दुचाकीने घरी जात असताना अज्ञात व्यक्तींसोबत वाद झाला, नंतर वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी अतुलवर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला. जखमी अतुलला नागरिकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.
दुसरी हत्या – अर्ध्या तासात दुसरा खून भवानी पेठेतील देशमुख फाईलजवळील घरासमोर झाला या खूनात राजू संजीव गायकवाड या १८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीनिमित्त शहरात सायंकाळी रॅली काढण्यात आली असून या रॅलीत राजू गायकवाड हेही उपस्थित होते, यावेळी देशमुख फाइल परिसरातील काही तरुणांशी राजूचा वाद झाला सोडवला गेला. मात्र रात्री अडीचच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती राजूच्या घरी आले आणि राजू घरातून बाहेर आला असता आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला आवाज ऐकून आरोपी फरार झाला. राजूला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दोन्ही घटनांचा तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत. या दोन्ही घटनांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तत्परतेने सक्रिय झाले असून, या निर्घृण हत्येमुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.