दोन हत्याकांड प्रकरणात काही तासात आरोपीतांना रामदास पेठ पोलिसांनी केली अटक!
पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला यांची धडक कार्यवाही एकाच रात्री घडलेल्या दोन हत्याकांड प्रकरणात काही तासात आरोपीतांना अटक करुन दोन्ही गुन्हे उघडकीस आणले. दि.१८ एप्रिल रोजीचे मध्यरात्री दरम्याण जैन कटलरीच्या समोर गुजराती स्वीट रेल्वे स्टेशन अकोला येथे तीन अज्ञात इसमांनी मृतक अतुल लक्ष्मण थोरात वय ३० वर्ष रा. अशोक नगर, अकोट फैल अकोला यांना शुल्लक कारणावरुन धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करुन जख्मी केले उपचारा दरम्याण जखमीचा मृत्यु झाला असा अशी तक्रार शैलेश मधुकर वाघमारे वय ३२ वर्ष स. अशोक नगर अकोला यांचे जबानी रीपोर्ट वरून पो.स्टे.. अप.न.१६६/ २४ कलम ३०२,३४ भादवी चा दाखल करण्यात आला. तसेच घटणास्थळ वर हजर असतांना रामदासपेठ पोलीसांना माहीती मिळाली की, बुधवारच्या रात्री १.३० वाजताच्या सुमारास येथे जुन्या वादाचे कारणावरुन तीन इसमांनी मयत नामे राज संजय गायकवाड वय १९ वर्ष रा. बजरंग चौक, विजय नगर अकोला यांना धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करून जख्मी केले सदर जख्मी याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला तक्रार करते ऋषीकेश संजय गायकवाड वय २३ वर्ष रा विजय नगर अकोला यांचे फिर्याद वरून पो स्टे ला अपन १६७/२४ कलम ३०२,३४ भादवि वा गुन्हा दाखल झाला.
सदर गुन्हयाचे तपासात पो स्टे तपास पथकाने सदर घटनास्थळावी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारचे माहिती वरून आरोपी मनिष शरद भाकरे वय २१ वर्ष, ऋषीकेश दिपक आपोतीकर वय २० वर्ष दोन्ही रा. देशमुख फैल अकोला व एक वि.सं.बा. रा माता नगर यांना सदर गुन्हे प्रकरणात चौकशी कामी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी असता त्यांनी जैन कटलरीच्या समोर गुजराती स्वीट रेल्वे स्टेशन अकोला येथे अतुल लक्ष्मण थोरात यांची हत्या केल्याची तसेचा विजय नगर येथील राज संजय गायकवाड अकोला यांची आम्ही तिन मित्रांनी मिळून एकाच रात्री दोन खुन केल्यावी कबुली दिली वरून एकाच रात्री घटलेल्या दोन्हा खुनाचे गुन्हे काही तासाचे आत उघडीस आनुन आरोपीता अटक केले.
सदरची कामगीरी बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, अभय डोंगरे अपर पालीस अधिक्षक श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, मनोज बहुरे यांचे मार्ग दर्शनाखली सपोनि के डी. पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा सोनुने सपोउपनि सदाशिव सुळकर, पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, पोहवा किरण गवई, पो. कॉ. श्याम मोहळे, पो. कॉ अनिल धनभर, पो. कॉ संदिप वानखडे, म.पो.कॉ. पुजा यंदे सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केली.