योगी आदित्यनाथ यांची अकोला सभा रद्द..
अकोल- लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ भाजपचे दिग्गज नेते नरेंद्र मोदी, अमित शहा हे अकोला महानगरात येणार असल्याच्या चर्चा यापूर्वी जोमाने सुरू होत्या.अखेर या चर्चांना विराम देत भाजप गोटातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ हे अकोला महानगरात जाहीर सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यांच्या जाहीर सभेचा कार्यक्रम शास्त्री स्टेडियम मध्ये दिनांक 21 एप्रिल रोजी जाहीर ही करण्यात आला आहे.मात्र आदित्यनाथ योगी अकोला महानगरात येणार आहेत काय याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ हे अकोला महानगरात येत नसून त्यांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा महानगरात सुरू आहे. असे झाले तर योगी समर्थकांची घोर निराशा होणार हे मात्र खरे ! भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला महानगरात राष्ट्रीय स्तरावर चा नेता अद्यापही आला नाही.मतदानास अवघे आठ दिवस उरले असताना राष्ट्रीय पातळीवरील नेते अकोल्यात सभेच्या माध्यमातून का येत नाही हा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे. महायुतीच्या उमेदवारांची मदार केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असून केवळ फडणवीसच राज्यभर दौरे करून भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे जागोजागी आवाहन करीत आहे. मात्र अकोल्यात फडणवीस अनुप धोत्रे यांच्या प्रचारास येणार काय हा प्रश्नही या निमित्ताने चर्चिल्या जात आहे.