अवकाळी पावसाचा इशारा
अकोला, दि. 22 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात दि. 22 व 23 एप्रिल रोजी वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी आदी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.