पतीसोबत वाद होत असल्यामुळे पत्नी आपल्या माहेरा आली होती, संतापात असलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ९ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या केली. सदर दुहेरी हत्याकांडाने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना ही रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संतोषी माता मंदिराजवळ असून पत्नीचे नाव रश्मी म्हात्रे आणि नऊ वर्षाची मुलगी माही म्हात्रे आहे, तर आरोपीचे नाव मनीष म्हात्रे असे आहे. रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह पोहोचून दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात रामदास पेठ पोलीस करीत आहेत.