जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान
अकोला दि २६ : जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सकाळी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिका-यांसमवेत डॉ.जुईली अजित कुंभार यांनीही मतदान केले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मतदान आपला महत्त्वाचा अधिकार असून प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा घेतला.