बाळापूरचे पोलीस निरीक्षक यांचा गाडीचा अपघात!
अकोला: बाळापूरचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे हे काल अकोला लोकसभा निवडणुकी चे कार्य करून बाळापूरचे पोलीस निरीक्षक अनिल जुमडे ते अकोला येथील घराकडे निघाले असताना अकोला बाळापूर रोड वरील व्याळा फाटा जवळी रिलायन्स पेट्रोल पंप जवळ शुक्रवारी मध्य रात्री अपघात झाला आहे गाडी क्रमांक एम एच ३० बी इ १००८ गाडीने चार पलट्या खाल्ल्या असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात अनिल जुमडे हे जखमी झाले. ते अकोला येथील डॉ अमोल रावणकार यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती आहेत.
अपघाताचे वेळी कार मध्ये असलेले बलून लगेच उघडल्यामुळे अनिल जुमळे या अपघातातून बचावले आहेत. त्यांचेवर रावणकार हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे डॉ. अमोल रावणकार यांनी सांगितले. मात्र हा अपघात कसा झाला व का झाला ! याबाबत तर्खितर्क निर्माण होत आहेत.
दरम्यान आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अनिल जुमळे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. बाळापूरचे पोलीस निरीक्षक यांच्यावर उपचार सुरू आहे.