अकोला शहरातील जुने शहरातील शिवसेना वसाहत मध्ये तीन घरांना आग!
अकोला शहरातील दाट वस्तीमध्ये वसलेल्या शिवसेना वसाहत मध्ये आज सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान तीन घरांना भीषण आग लागली या आगीमध्ये तिन्ही घराचे साहित्य जळून खाक झाले आगेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अश्विन नवले यांनी तात्काळ घटनास्थळ दाटून आगी संबंधित माहिती अग्निशामक विभागाला दिली अग्निशामक विभागाने तात्काळ घटनास्थळ घाटून आग आटोक्यात आणली प्राप्त माहितीनुसार सदर आग ही शॉर्टसर्किट मुळे लागल्याचे बोलले जात आहे. या आगीमध्ये जिजाबाई शांताराम खेळकर.नंदा राजेंद्र मात्रे.महादेव शांताराम खेळकर यांची घरे जाळले असून यांचा संसार उघड्यावर पडला आहे. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र तीन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.