पेन्शन घोटाळ्यातील आरोपी मोकाटच? पंधरा दिवसाच्या मुदतवाढीवर प्रश्न चिन्ह?
चौकशी अहवाल आयुक्तांच्या दालनात
अकोला :- अकोला महानगरपालिकेत चार सौ पार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याच्या दैनिक सत्य लढाच्या बातमीने मनपा प्रशासन खडबळून जागे झाले होते. याबाबत मनपा प्रशासनाने चौकशी समिती गठित केली होती. त्या चौकशीत मागील दोन वर्षात पेन्शन लिपिक अशोक साळंखे यानी तीन कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याने मनपा प्रशासनाने अशोक सोळंखे यास सात दिवसात आपले काय म्हणणे आहे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर सात दिवसानी नोटीस बाबत खुलासा न करता पुन्हा पंधरा दिवसाचा अवधी मागण्यात आल्याने प्रशासनाने तो सुद्धा दिल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. पंधरा दिवसाचा अवधी संपला असुन पेन्शन लिपीक आपल्या अर्धांगिनी सोबत मंगळवारी उपायुक्त ( प्र.)यांच्या सरकारी निवास स्थानी भेटायला गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे परंतु उपायुक्त( प्र.)यांनी घरी भेटण्यासाठी टाळल्याने मंगळवारी पेन्शन लिपिक अशोक सोळंखे हे मनपात येवुन उपायुक्त( प्र.)यांना झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम भरपाई करुन देतो असा वार्तालाप केला असल्याचे बोलले जात आहे. परंतु अधीक अकरा वर्षाची चौकशी बाकी राहिल्यामुळे उपायुक्त यांनी त्यांना खणकावले असल्याची माहिती मिळाली आहे. याचा अर्थ कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांने अपहार करायचा आणी भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर भरपाई करुन देतो असे बोलने म्हणजे न समजण्यापलिकडे.दोन वर्षाच्या चौकशीत तीन कोटीचा अपहार उजेडात आला असला तर मागील अकरा वर्षात या बहाद्दराने किती कोटीचा भ्रष्टाचार केला याची व्याप्ती चौकशी अंती समजणार. परंतु भ्रष्टाचार सिध्द झाल्यावरही मनपा प्रशासन गुन्हे का दाखल करत नाही? पेन्शन घोटाळ्याच्या चौकशीत ऐंशी नाव समोर आले असल्यावरही या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार? तसेच चौकशीत ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्यांची सुध्दा नावे यात सामिल असल्याने पेन्शन घोटाळ्याची चौकशी निष्पक्ष होणार की नाही असा सवाल उठत आहे.
अधिक माहिती घेतली असता या घोटाळ्यात मनपातील जंपिंग पदोन्नती घेतलेल्या अधिका-यांच्या बैंक खात्यात एक वेळ नसुन कित्येक वेळा पैसे टाकल्याची नोंदी सापडल्या आहेत.या मृतकाच्या नावाने काढलेल्या रक्कमेवर यांनी प्लाट,शेती,घरे,फ्लॅट घेतल्याची माहिती आहे. यामध्ये सामान्य प्रशासन,लेखा,अंतर्गत लेखा परिक्षण,रोखपाल विभागासह तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा परिक्षक,सह कर्मचारी अधिकारी सामिल असल्याने चारसौ पार कोटीच्या भ्रष्टाचारावर मनपा आयुक्त मौन असल्याने याची फक्त चौकशीच होते की येणाऱ्या काळात कारवाई होते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अकोला मनपा भ्रष्टाचाराचा अड्डा बनत चालली आहे यावर एकाही अधिका-यांच्ये लक्ष कसे नाही? हे न सुटलेल कोडच.राज्याचा
ऑडिट विभाग करतो तरी काय? इतक्या मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आणी ऑडिट मध्ये आक्षेप न आल्याने ऑडिटर यांनी सुध्दा हात ओले केल्याने भ्रष्टाचार झाला अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. चौकशी समितीत चौकशी अधिका-यांची नावे आल्यावर सुध्दा त्यांना या मधुन का हटविण्यात आले नाही याबाबत मनपा प्रशासन एक शब्द ही बोलण्यास तयार नाही.
सर्व नियोजन बंध्द पध्दतीने शैकडो कोटीचा भ्रष्टाचार करण्यात आला.यामध्ये साखळी पध्दतीचा वापर झाल्याचे कळते कारण इतक्या मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करणे एका माणसाचे काम नाही हे यावरुन दिसत आहे.
या पैश्यातुन पेन्शन लिपिकाने मनपा शेजारीच आठ ते नऊ दुकाने विकत घेतली आहे. तसेच एवढ्यावर न थांबता यात अर्धा गिनीच्या नावाने डमी अकाऊंट खाते खोलून पंजाब नॅशनल बँकेत करोडो रुपये टाकले असल्याचे उघ डशील आले आहे. तसेच ज्या मनपा कर्मचाऱ्यांचे तुटपुंजे वेतन होते त्यांच्याकडे मोठमोठे बंगले,घरे फ्लॅट, शेती कोठुन आली याचाही तपास केल्यास खुप मोठे घबाळ हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच या पैशातून शेती,बंगले,सोने,आणखीन अचल संपत्ती असे अनेक व्यवहार खरेदी विक्री कार्यालयातुन माहिती मिळु शकते.याबाबत मनपा प्रशासन चौकशी करणार का? एखाद्या कर्मचाऱ्यांने थोडाफारही अपहार केला असल्यास त्यावर बडतर्फ, निलंबनाची कारवाई होते मग या घोटाळ्यात वेळ देण्याचे कारण आणी कारवाही साठी चे धोरण मनपा उपायुक्त, आयुक्त याचा खुलासा करणार का? की यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करणार हे लवकरच समोर येणार आहे. यामध्ये असलेल्या अधिका-यांवर सुध्दा पोलीस कारवाई अटळ असल्यामुळें या भ्रष्टाचारात असलेल्या अधिका-यांचे धाबे मात्र दणाणले आहे.
मृतकाच्या टाळुवरचे लोणी खाणारे ते अधिकारी कोण हे पाहणे औतुक्याचे होईल. तसेच घोटाळ्याची बातमी प्रसिध्द होऊनही राज्यातील तपास यंत्रणा कश्या काय कारवाही साठी पुढे येत नाही हे न समजण्यासारखे झाले आहे.तोपर्यंत या चारसौ कोटीच्या पेन्शन घोटाळ्यावर सत्य लढा बारकाईने लक्ष ठेवून आहे. जसजसा तपास पुढे जात आहे तशी माहिती जनतेसमोर आणण्यास सत्य लढा कटिबद्ध आहे.
लवकरच तपास अधिका-यांनी तपास करुन यामध्ये सामिल असलेल्या अधिका-यांवर कठोर कारवाई करुन पोलीस तक्रार करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. याप्रकरणात चौकशीत नेमलेल्या अधिका-यांना दुरध्वनी वरुन माहिती मागितली असता काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काही कर्मच्या-यांनी योग्य कारवाही झाल्यास भ्रष्टाचारात अकोला महानगरपालिका राज्यात प्रथम स्थानी येणार असे सुतोवाच केले. प्राप्त माहिती नुसार निवडणुक कामात सर्व कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कारवाही साठी वेळ लागत आहे असे समजले.पेन्शन घोटाळ्यात पंधरा दिवसाचा अवधी संपल्यावरही नोटीस चा जवाब पेन्शन लिपी काने सादर नाही केल्याने सबंधित अधिकारी यांनी याबाबतचा अहवाल प्रस्तावित करत मनपा आयुक्त तथा प्रशासक सुनील लहाने यांच्या कार्यालयात सादर केला आहे. या घोटाळ्यावर आयुक्त तथा प्रशासक काय कारवाई करतात याकडे मनपातील व शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.