रोडच्या अधुऱ्या कामाने रॉंग साईड गाडी चालवणे भोवले!

रोडच्या अधुऱ्या कामाने रॉंग साईड गाडी चालवणे भोवले!

पातूर शहरात अकोला हैदराबाद मार्गावर आमदारांच्या गाडीला भीषण अपघात!

या अपघातात चार ते पाच जण ठार! 

पातूर शहराजवळील अकोला हैदराबाद मार्गावर. बायपास असलेल्या अकोला बाळापूर रोड वरील उड्डाणपूल हा नाना साहेब मंदिर जवळील रोडवर झालेला अपघात हा दोन फोर व्हीलर आमने-सामने धडकल्याने भिषण अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही गाड्यांमधील जवळजवळ दोन ते तिन प्रवासी ठार झाले आहेत या दोन्ही गाडीतील प्रवासी संख्या एकूण आठ ते नऊ जणांची संख्या होती व यामधील एक गाडी पातुर तालुक्यातील अस्टूल या गावची असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरी गाडी आमदार सरनाईक यां यांच्या मालकीची असल्याची कळत आहे या अपघाताला रोड चे रखडलेले अधुरे काम त्यामुळे वाहन चालकाला रॉंग साईड वाहन चालवणे मजबुरीचे झाले आहे एकीकडून इलेक्ट्रिक पोल विद्युत प्रवाह खांबांमुळे रोडचे काम रखडलेले आहेत त्यामुळे रोड प्रशासनाने अजून पर्यंत पूर्ण काम केले नाही रोड प्रशासनची दिरंगाई वाहन चालक व प्रवाशांच्या जीवावर बेतली आहे या अपघाताची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अपघात ठिकाणी पोहोचून मृतकांना शवविच्छदनाकरिता करिता जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे व या अपघातातील जखमींनवर उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news