अकोला शहरातील गोरक्षण रोड येथील भारती यांच्या बंगल्यावर धाडसी चोरी
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगरमधील भारती यांच्या बंगल्यावर धाडसी चोरी झाल्याची घटना शुक्रवार रात्रीच्या उशिरा, घडली आहे.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगरमधील व्यापारी भारती यांच्या बंगल्यात कोटी रुपयाची चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघड झाली आहे. या घटनेत चोरट्यांनी मौल्यवान दागिने तसेच रोकड लंपास केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सदर चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले या धाडसी चोरीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञ दाखल झाले होते.श्वानपथक सुद्धा दाखल झाले आहे. एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये चोरट्यांनी पूर्व अभ्यास करून चोरी केल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. कारण बंगल्याच्या पाठीमागील बाजूस शिडी आढळून आली असून पूर्व अभ्यास करून चोरी केल्याचे दिसून येत. ही चोरी एक कोटी रुपयाच्या जवळपास असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सदर बंगल्यामागे शिडी व दागिन्यांचें खाली बॉक्स मिळून आला आहे. सदर चोरांनी शिडी वापर करून चोरी करणाऱ्या आली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या कोटी रुपयाचा चोरीमुळे अकोला पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर चोरीचा तपास पोलीस करीत असून या चोरी प्रकरणी लवकरच चोर पकडल्या जातील असे आश्वासन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले आहे.