चारसौ पार कोटी घोटाळ्यात राजकिय हस्तक्षेप?
अकोला :- महानगरपालिकेतील चारसौ पार कोटीच्या पेन्शन घोटाळ्यासंदर्भात राजकिय हस्तक्षेप होत असुन अकोला जिल्ह्यातील एका आमदाराने प्रकरण मॅनेज करण्यासाठी अकोला मनपा आयुक्त यांच्यांशी गुप्त मिटिंग ठेवली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आमदाराच्या सांगण्यावरून आयुक्त महोदय या मिटींगला जातात का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भ्रष्टाचाराविरोधात आमदाराने हस्तक्षेप केल्यास समजु शकते परंतु भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी आयुक्तांशी मिटिंग ही कशा साठी असा प्रश्न होता सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे हे लवकरच सत्य लढा आपल्या समोर उघडकीस आणणार आहे. प्राप्त माहिती नुसार अशोक सोळंके पेन्शन लिपीक यानी तिन कोटी रुपयाची पावती आमदाराच्या नावाने फाडली असल्याची चर्चा असल्यामुळें आमदार महोदय या घोटाळ्यात रस घेत असल्याची माहिती मिळाली आहे. तो आमदार कोण? याकडे शहरातील जनतेसह मनपा कर्मच्या-यांचे लक्ष लागले आहे. आता या आमदाराच्या विरोधात तसेच घोटाळ्याची तक्रार इतर नागरिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार करणार आहेत.
अश्या भ्रष्टाचारात हात ओले करणारा आमदार लवकरच समोर येणार आहे. तो आमदार कोण हे सत्य लढा नागरिकांच्या समोर आणणार आहे. आता या भ्रष्टाचारावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.