भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर

भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर

देशाचा राजा कायम राहणार? बु

लडाणा जिल्ह्यातील भेंडवळचं भाकित काय

माणसाला भविष्याची चिंताच असते असे नाही तर भविष्यातील घडामोडीची उत्सुकता पण असते. भविष्यातील घडामोडींचा अगोदरच अंदाज जाणून घ्यायचा असतो. बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळचे भाकित काय ते पाहण्यासाठी विदर्भासह खानदेश आणि जवळच्या मध्यप्रदेशातून पण बरीच मंडळी ठाण मांडून असतात. यंदा लोकसभा निवडणुकीचा बार उडालेला आहे. जनता मतपेटीतून त्यांचा उमेदवार निवडून देईल. पण देशाचा राजा कोण होणार याची उत्सुकता आहे. याविषयी भेंडवळची भविष्यवाणी आहे तरी काय?

300 वर्षांची परंपरा

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ हे गाव आहे. येथे दरवर्षी घटमांडणी करण्यात येते. याच घट मांडणीला भेंडवळचं भाकीत असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही घट मांडणी होते. आज शनिवारी सकाळीच भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घट मांडणी केली. यामध्ये 18 प्रकारचे धान्य आणि मध्यभागी एक गोल खड्डा करुन त्यात मटकी ठेवली जाते. रात्री ज्या हालचाली होतात, त्याचे सकाळी निरीक्षण करुन अंदाज वर्तविला जातो.

चांगला पाऊस, हिरवगार सपान

11 मे रोजी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. पावसाची सुरुवात अडखळत असली तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस असेल. यंदा आबादाणी आहे. पिकं जोमात असतील. यंदा रान हिरवगार असेल. रोगराईचा प्रादूर्भाव कमी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राजा असेल कायम

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. चौथ्या टप्प्याकडे निवडणुका वळल्या आहेत. तीन टप्प्यात कमी मतदानाने चिंता वाढलेली आहे. तर देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, कोण पंतप्रधान होणार, जनता कुणाच्या पारड्यात मताचा कौल टाकणार याविषयीची कमालीची उत्सुकता आहे. भेंडवळच्या भाकितानुसार, देशातील राजा कायम असेल. तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल. शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news