डीपीमध्ये काम करत असताना खासगी वायरमनला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू !
अकोला जिल्ह्यातील पारस गावातील भगतवाडी परिसरात सरकारी लाइनमन सह खासगी लाईनमन काम करत होते.
डीपीमध्ये काम करत असताना खासगी वायरमनला विजेचा धक्का बसला, मृत्यू झालेल्या मृतक व्यक्तीचे नाव पांडुरंग साबळे असल्याचे समजते.
अकोला जिल्ह्यातील पारस गावातील भगतवाडी परिसरात सरकारी लाइनमनसह खासगी लाईनमन काम करत होते. यादरम्यान त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग साबळे असे मृताचे नाव आहे. हायव्होल्टेज डीपीच्या दुरुस्तीचे काम करत असताना मृताला विजेचा करंट निर्माण झाला. त्यामुळे त्याने विजेच्या खांबाला चिटकल्यामुळे तो मृतक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाला उलटा लटकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या मृताला जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम करिता अकोला सर्वोच्च रुग्णालय येथे आणण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.