बेवारस छ….बंदूक सापडल्याने एकच खळबळ!
सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राधा किसन प्लॉट येथे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाल्याची साफसफाई करत असताना बंदूक सापडल्यामुळे एकच खबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. या वेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ राधा किसन प्लॉट पोचून सदर बंदूक ची तपासणी केली असता ती बंदूक छऱ्याची असल्याचे दिग्दर्शनात आले यावेळी सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला सदर बंदुक छऱ्याची असून सदर बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.