जेतवन नगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये सशस्त्र राडा!
गंभीर जखमी युवकावर उच्चार सुरू युवकाची प्रकृती चिंताजनक!
खदान पोलीस स्टेशन हद्दीतील जेतवन नगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये सशस्त्र राडा झाल्याची घटना रविवार, १२ मे रोजी उशिरा रात्री घडली आहे. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
खदान येथील जेतवन नगरा मध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये सशस्त्र राडा झाला असून, यामध्ये बागडे नामक युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, खदान पोलिसांनी काहींची धरपकड सुरू केली आहे. सदर घटनेची माहिती खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा आपला मोर्चा खदान परिसरात वळविला आहे. सध्या खदान परिसरातील जेतवन नगरात शांतता असून, खदान पोलिसांची प्रत्येक घडा मोडी वर बारकाईने नजर आहे. या राडा प्रकरणी काहींना ताब्यात माहितीदेखील आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.