अकोल्या शहरात व्यापाराचे अपहरण!
खून चोरी दरोडा अपहरण प्रकारामुळे नागरिक भयभीत!
अकोला शहरात दिवसान दिवस खून चोरी दरोडा या कारणाने सामान्य नागरिक भयभीत झाले आहे तसेच अपहरण कारणामुळे अकोल्या जिल्ह्यातील तसेच शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. दिनांक 13 मे च्या रात्री सुमारास रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रायली जीन परिसरात राहणारे अरुण वोरा या व्यावसायिकाचे मारुती व्हॅनमध्ये अज्ञात आरोपींनी अपहरण केले असल्याची माहिती प्राप्त झाली आह घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह रामदास पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले असून व्यापारी अरुण वोरा यांचे नेमके अपहरण कोणी केले याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.