अपहरण कर्त्या ची माहिती द्या आणि पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळवा!
माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल…
अकोला : अपहरण झालेले व्यक्ती अरुणकुमार मगनलाल वोरा रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला यांची माहिती देणाऱ्या आणि शोध कार्यात मदत करणाऱ्यास पंचवीस हजारांचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे.पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला अंतर्गत येणारे चार जिन दगडी पुलाजवळील काचेच्या बॉटल विकत घेणारे व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला हे दिनांक १३ मे रोजी रात्री ९ ते ९.३० वा. चे सुमारास त्यांचे चार जिन दगडी पुल
जवळील गोडावून बंद करून घरी निघाले होते. त्यांची मोपेड गाडी उभी करण्याचे ठिकाणी गेले असता त्यांना २ ते ३ अनोळखी इसमांनी जबरदस्तीने ओढत नेवुन एक जुन्या पांढऱ्या रंगाचे कार मध्ये जबरदस्ती कोबुंन घेवुन गेले आहेत. त्यांनी अंगात हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या पटटया असलेले टि शर्ट व क्रिम रंगाची पॅन्ट परीधान केलेली होती त्यांची उंची ०५ फुट ०८ इंच, वर्ण गोरा व शरिरबाधा- मजबुत आहे. एक जुनी पांढऱ्या रंगाची मारोती ८००/ अल्टो / झेन कार ती असावी. अशा वर्णनाची व्यक्ती बाबत जे व्यक्ती पोलीसांना माहिती देतील त्यांना पोलीस अधिक्षक यांचे मान्यतेने २५,००० रूपयाचे बक्षीस देण्यात येईल तसेच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.अशी माहिती रामदास पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे यांनी दिली आहे.