जिल्हाधिकारी मनपातील जम्पिंग प्रमोशन वर कारवाई करतील का!

जिल्हाधिकारी मनपातील जम्पिंग प्रमोशन वर कारवाई करतील का!

जम्पिंग पदोन्नतीमुळे 12 वर्षापासुन मनपाती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला ब्रेक!

अकोला :- महानगरपालिका तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या विभाग प्रमुखांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्यासाठी शासनाच्या पॅनलवर नियुक्त अधिकार-या मार्फत चौकशी नेमुन सुरवात केली होती यामध्ये चौकशी अधिका-यार्नी आतापर्यंत चौकशी पुर्ण केल्या असुन चौकशी प्रकरणात आपला अहवाल सादर केला आहे.अकोला मनपाचे सर्वच विभाग प्रमुख जंपिंग पदोन्नती प्रकरणात असल्यामुळे आदेशाची अमलबजावणी कोण करणार? या विभाग प्रमुखांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत जंपिंग पदोन्नती घेतलेल्या अधिका-यांनी करोडो रुपयांचे अग्रिमराशी, आस्तित्वात नसलेली पदे घेऊन शासनाची दिशाभुल केल्याने कारवाही प्रस्तावित असल्याचे कळते.तसेच जंपीग पदोन्नती घोटाळा सामिल असल्याचे कळते परंतु सामान्य प्रशासन विभाग प्रमुखच जम्पिंग प्रमोशन मध्ये असल्यामुळे या चौकशीला ब्रेक लावण्याचे कट कारस्थान रचत अधिकाऱ्यासमोर प्रकरण येऊ देत नसल्यामुळे गेल्या एक वर्षापासून पासुन चौकशी पुर्ण होऊन प्रकरण थंडबस्त्यात पडल्याने चौकशी वर आयुक्तांचे अंतिम आदेश बाकी आहे. संध्यास्थितीत आयुक्त तथा प्रशासक यांचा पदभार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या कडे असुन जिल्हाधिकारी यांनी जंपिंग पदोन्नती वर कारवाई केल्यास 12 वर्षापासून स्थगित असलेली पदोन्नती प्रक्रिया सुरळीत होईल व अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात विषेश लक्ष देऊन जंपीग पदोन्नतीवर कारवाही करण्याची मागणी मनपा आवारात सुरु आहे. आज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मनपाचे सुत्रे हातात घेताच आपल्या शैलीचा परिचय देत चौकशी प्रकरणे सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचेही समजते परंतु ज्या अधिका-यांना आदेश दिले तेच यात सामिल असल्यामुळे जिल्हाधिकारी समोर प्रकरण सादर करतात की नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. पुन्हा जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याने भ्रष्ट अधिका-याच्या पायाखालची वाळु सरकली आहे. गेल्या 15 वर्षापासून जंपीग पदोन्नती बाबत निर्णय न झाल्यामुळे गेल्या 12 वर्षापासुन मनपात पदोन्नती झाली नसल्यामुळे इतर कर्मच्या-र्यांना पदोन्नती पासुन वंचित ठेवल्या जात आहे.

जिल्हाधिकारी यांनी पदभार स्विकारताच यावर विषेश लक्ष देऊन जम्पिंग पदोन्नती चा घोटाळा उजागर करण्याची मागणी कर्मचारी करीत आहेत.

कुली,चपराशी, ड्रायव्हर हे महानगरपालिकेत सहा.आयुक्त,विभाग प्रमुख सारख्या पदावर विराजमान असुन लवकरच यांची उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. यावर जिल्हाधिकारी अजित कुंभार काय निर्णय घेतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news