अवैध सावकारी बाबत प्राप्त तक्रारीवरून सहकार विभागाने शहरात तीन ठिकाणी टाकल्या धाडी.
अकोला शहरात अवैध सावकऱ्यांवर धाडी टाकून उप निबंधक कार्यालयाने एकच खळबळ निर्माण केली आहे..शहरातील काही अवैध सावकार अवैधरीत्या सावकारी करित असल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीनुसार अकोला शहरात आज दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिन ठिकाणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अंतर्गत धाडीचे डॉ. प्रविण एच. लोखंडे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्गदर्शनात व पोलीस बंदोबस्तासह 18 जणांच्या सहकार पथकाने टाकलेल्या धाडीत अवैध सावकारीचे आक्षेपार्ह साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.