चान्नी फाटा जवळील पुलावर अपघात चालक गंभीर जखमी

चान्नी फाटा जवळील पुलावर अपघात चालक गंभीर जखमी

किरण कुमार निमकंडे पातुर तालुका प्रतिनिधी सत्य लढा वाडेगाव – येथून तीन किलोमीटर असलेल्या चान्नी फाटा जवळील पुलावर ट्रक व चार चाकी वाहनाचा अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 18 मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहेधमिळालेल्या माहितीनुसार एम एच 46 बी क्यू ०५८३ आर्टिका चार चाकी वाहन तर वाडेगाव कडून पातुर कडे जात असलेल्या जीजे 36 व्हि 54 80 क्रमांक असलेला ट्रक ची वरील पुलावर समोरासमोर धडक लागली आरटीका गाडीचा चालक शेख अमीर शेख जाकीर वय वर्ष 24 गंभीर जखमी तसेच रशीद शहा जाफर शहा राहणार रिसोड जखमी झाल्याची घटना घडली आहे तर जखमींना नागरिकांनी तात्काळ वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात घालविले असता आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहेल खान यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा संदर्भात अकोला येथे पाठविले निर्गुणा नदीच्या पुलावरील झालेला अपघात एवढा भीषण होता की ट्रक हा जागेवरच पलटी झाला तर तर अर्टिका चार चाकी वाहन पुलावर लटकलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र निर्माण झाले झालेल्या अपघातामुळे काही काळ रोडवरील वाहतूक बंद होती त्यामुळे फुलाच्या दोन्ही साईडला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर घटनेची माहिती मिळतात वाडेगाव पोलीस चौकीतील कर्मचारी गावंडे व पवार अक्षय देशमुख जाफर घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सरकून वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news