अकोला डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरपीटीएस रोडजवळील मोर्णा नदीत ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह नदीतून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी जीएमसीकडे पाठवला आहे. हा मृतदेह एका मुलाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस तपास करत आहेत.