उद्या (21 मे) बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. उद्या (21 मे) बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. दुपारी एक वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. बारावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून काही वेबसाईट देखील देण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहताना दिसले. आता शेवटी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाईल.

mahresult.nic.in या साईटला जाऊन आपण निकाल पाहू शकतो. यासाठी सर्वात अगोदर आपल्याकडे परीक्षेच्या क्रमांक असणे आवश्यक आहे. Maharashtra SSC and HSC result येथे क्लिक करावे लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला परीक्षा क्रमांक, जन्म तारीख टाकून सबमिट करावे लागेल. Maharashtra board 12th results 2024 चा तुमचा निकाल दिसेल.

बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलीये. यामध्ये पुणे, कोकण, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर याप्रमाणे. आपण mahahsscboard.in  hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊन देखील बारावीचा निकाल पाहू शकता. यंदा राज्यात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान परीक्षा पार पडल्या.

राज्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाचे काम देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जातंय. आता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालची प्रतिक्षा केली जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news