आज लागणार बारावीचा निकाल, असा पाहा तुमचा निकाल

दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये  21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.

1) mahresult.nic.in

2) mahahsscboard.in

3) hsc.mahresults.org.in

4) hscresult.mkcl.org

5) results.gov.in.

या साईटवर जाऊन विद्यार्थी हे आपला बारावीचा निकाल आरामात पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. यंदाच्या निकालाच कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढणार असल्याचीही चर्चा आहे.

यंदा राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दरवेळी प्रमाणे यंदा देखील राज्यात संपूर्ण परीक्षा ही काॅपीमुक्त पार पडलीये. बोर्डाकडून या परीक्षेची जोरदार तयारी काही महिन्यांपासून सातत्याने सुरू होती.

बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आता कोणत्या विभागातील विद्यार्थी हे अव्वल राहतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news