अकोला जिल्ह्याची उन्हाची तीव्रता आणखी वाढली अकोल्याचे तापला 45.5 डिग्री!
अंगातून घामाच्या धारा…घराबाहेर पडणं मुश्किल,हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या राज्यामध्ये एकीकडे काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घालतंय. तर दुसरीकडे अकोल्या जिल्ह्यात कडाक्याचे ऊन पडत आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये हवामान खात्याकडून गुरुवार रोजी अकोल्याचे तापमान 45.5 डिग्री नोंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली अकोला शहरात जणू कर्फ्यू लागला सारखे दृश्य गुरुवार रोजी पहावयास मिळाले. अकोला शहराची बाजारपेठ उष्णतेमुळे सायंकाळपर्यंत ठप्प होती. तसेच रस्त्यावर सुद्धा गर्दी नव्हती गुरुवारी बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे शासकीय कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपल्या घरून न निघणे पसंत केले होते. आजच्या तापमानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तुलीआहे.