हिंदू ज्ञानपीठ शाळा बंद करण्या येत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन!
हिंदू ज्ञानपीठ स्कूल या शाळेची स्थापना १९६६ रोजी करण्यात आलेली आहे. शाळेच्या परिसरातील तसेच अकोल्या शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये गेले कित्येक वर्षापासून शिकत आहेत. मात्र काही महिन्यापूर्वी शाळेचे संचालक श्री चंद्रशेखरजी गाडगीळ यांनी एकदमच कोणतीही पूर्व सूचना न देता शाळा बंद करण्या येत आहे असे जाहीर केले. याप्रसंगी पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र एप्रिल महिन्यामध्ये शाळा सुरु राहणार असे एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली. या शाळेमध्ये बालवाडी पासून तर दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिकत आहेत. यानंतर २३ मे २०२४ रोजी पालकांची सभा बोलून आम्ही शाळा बंद करत आहे असे शाळेचे संचालक श्री चंद्रशेखरजी गाडगीळ यांनी जाहीर केले. यामुळे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्मित झालेले आहे. संचालक हे स्वतःच्या आर्थिक लाभा करिता हा निर्णय घेतल्याचे निदर्शनात आले.
संचालकावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी! पंकज साबळे
जिल्हा अध्यक्ष वास्तविक पाहता शासनाला व पालकांना कुठलीही पूर्व सूचना न देता असे जाहीर वक्तव्य संचकलाद्वारे करण्यात आले. नियमानुसार शाळा बंद करण्याचे अधिकार संपूर्ण रित्या शासनाला आहे. शाळा सुरू रहावी तसेच खालील मागण्या पालकांच्या मंजूर व्हाव्या व संबंधित संचालकावर नियमानुसार बंधन व कारवाई करण्यात यावी करीता सर्व हे पालक वर्ग व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने . निवेदनामध्ये खालील मागणे पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले.
१) शाळा पूर्वी प्रमाणे सुरू राहावी.
२) फी करिता थकबाकी असल्यास कुठलाच विद्यार्थी हा वंचित शिक्षणापासून व परीक्षेपासून वंचित राहू नये.
३) हिंदू ज्ञानपीठ स्कूल चे नियमानुसार ऑडिट होणे.
४) थकबाकी असलेल्या फी मध्ये सवलत देणे.
५) पालक समिती गठित करणे.
६) थकित असलेल्या फी वर दंड माफ करणे.
७) शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देणे.
८) ह्या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात संचकाला द्वारे देणे.
९) नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे.
१०) हिंदू ज्ञानपीठ स्कूल चा अकोला महानगरपालिकेचा मंजूर नकाशा जाहीर करणे. याबाबतीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सर्व हे पालक वर्ग व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.