उष्माघाताचा धोका;अकोला जिल्ह्यात ३१ मे पर्यंत जमावबंदीचा आदेश

उष्माघाताचा धोका; जिल्ह्यात ३१ मेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना – जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा आदेश

अकाेला, दि. 25 उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. हा आदेश त्यांनी शनिवार, २५ मे २०२४ राेजी निर्गमित केला.
प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश २५ मे २०२४ राेजी प्राप्त झाला. त्यानुसार २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास हाेऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय याेजना प्रभावीपणे राबवणे अावश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २५ मे राेजीच्या दुपारी ४पासून ते ३१ मेपर्यंत फाैजदारी प्रक्रीयात संिहताचे कलम १४४ चे आदेश करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिदंडाधिकारी श्री कुंभार यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्याेगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमाेपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचारयत, महानगरपालिका, नगर परिषद, पाेलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी १० वाजतापर्यंत व सायंकाळी ५ नंतर काेचिंग सेंटर चालवावेत. सकाळी १० ते ५ वेळेत क्लास सुरु ठेवायचे असल्यास तेथे पंख, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंिधत क्लासच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news