आता होणार अकोला शहरातील संपुर्ण पाणी पुरवठा दर पाचव्या दिवशी.
अकोला दि. 25 मे 2024 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये महान धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत असते. महान धरणात आज रोजी 17.90 टक्के जलसाठा शिल्लक असून व मोठ्या प्रमाणात वाष्पीभवन लक्षात घेता अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा अकोला शहरात चार दिवसा आड होणा-या पाणी पुरवठ्यात एक दिवसाने वाढ करण्यात आली असून आता सोमवार दि. 27 मे 2024 पासून संपुर्ण शहराला पाच दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याबाबत मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. तरी शहरातील नगरिकांनी याची नोंद घेऊन पिण्याचे पाणी काट कसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा करण्यात येत आहे.
————————————————————————————————–