बोरगाव मंजू येथील जैन हार्डवेअर आगीच्या भक्ष्यस्थानी
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील एका हार्डवेअर दुकानाला भिषण आग लागली, या आगीत लाखो रुपयांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्यामुळे मोठे नुकसान झाले ही घटना शनिवारी सायंकाळी दरम्यान घडली,
बोरगाव मंजू येथील वैभव वाडेवाले यांचे महामार्गावर बालाजी मंदिरासमोर हार्डवेअर दुकान आहे या दुकानाला भिषण आग लागली, दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला, दरम्यान या आगीत लाखो रुपयांच्या मालाची हाणी झाली, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला,