बोरगाव मंजू परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक!
दोन गटात वाद, पोलिस बंदोबस्त तैनात
शांतता राखण्याचे पोलीसांचे आवाहन
अफवांवर विश्वास ठेवू नका
बोरगाव मंजू – स्थानिक शहरातील दोन गटात वाद निर्माण झाला होता, घटनेनंतर किरकोळ दगडफेक झाली होती,घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच दखल घेऊन घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व शांतता राखण्याचे आवाहन केले,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला होता, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,व परिस्थिती नियंत्रणात आणली, दरम्यान नेमका वाद कसा झाला हे मात्र समजू शकले नाही, घटनेनंतर ठाणेदार मनोज केदारे यांनी वरिष्ठांना माहिती दिली, जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले, बोरगाव मंजू शहरात शांतता आहे