रस्ता अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू
अकोला- जुने शहर पोलीस ठाण्या अंतर्गत खामगाव रोडवरील किराणा मार्केटजवळ झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडवून तेथून पळ काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलीस अधिक तपास करत आहेत.