मे महिना सरत आलाय आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे…. जून महिन्यात पेरणीला सुरवात होईल. त्यापूर्वी शेतकरी बियाणे खरेदीसाठी बाजारात येतो पण त्याला बियाणं मिळत नसल्याने अकोल्यातील नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी टाहो फोळत…. रस्ता जाम करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. यावेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली…. तरी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत…. जाब विचारला. शेतकऱ्यांनी चक्का जाम केल्याने बाजारातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. एका दुकानात बियाण असल्याची माहिती होती मात्र तपासणी केल्यानंतर गोडावूनमध्ये काहीच न आढळल्याने शेतकरी परतले.