येवता कुंभारी येथे पोहण्यासाठी गेलेल्या खदान तलावात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
अकोला : सलग सहा तासांच्या अथक परिश्रमा नंतर सोनुचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला आले यश.. शहरातील येवता कुंभारी येथे पोहण्यासाठी गेलेल्या मित्रांन पैकी ऐकाच्या जीवावर हे पोहायला जाणे जीवघेणे ठरले असून येथे असलेल्या खदानितील तलावात बुडून मृत्यू झाला सलग सहा तासांच्या अथक परिश्रमा नंतर बुडणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह शोधण्यात संत गाडगेबाबा बचाव पथकाला यश आले.
बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येवता येथे असलेली खदान ही जीवघेणी खदान म्हणून प्रसिद्ध आहे प्रशासनाने या जागेला सिल लावले असले तरी येथे कोणी सुरक्षा रक्षक नाही किंवा सुरक्षे करिता कोणतेच साधन उपलब्ध नाही परिणामी येथे पोहण्यासाठी नागरिक येतात आणि आपला जीव गमावून बसतात असलाच प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडला डाबकी रोड येथील गजानन नगर येथील काही मुलांनी उन्हाळ्यात पोहण्यासाठी कुंभारी येथील बंद पडलेल्या खदानितील तलावात पोहण्याचा बेत आखला व दुपारी हे नऊ मित्र पोहण्यासाठी येथे पोहोचले सर्वांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहून काठावर आले मात्र यांच्या पैकी १९ वर्षीय सोनू वानखेडे हा पाण्यातून बाहेर आला नाही काठावर आलेल्या सोनुच्या मित्रांनी त्याला आवाज दिला मात्र कोणताच प्रतिसाद आला नसल्याने सोनू हा पाण्यात बुडाला असल्याची खात्री झाली मुलांनी आरडा ओरडा केला असता स्थानिक नागरिक तेथे पोहोचले व घडलेला प्रकार पाहता घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सोनू यास शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सोनूचा या खोल पाण्यात अंदाज येत नसल्याचे पाहून पिंजर येथील दीपक सदफळे यांच्या संत गाडगेबाबा बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केली असता रात्री ९ वाजताच्या दरम्यान सोनू वानखेडे याचा मृतदेह शोधण्यात यश आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविला असून अधिक तपास सुरू आहे. सोनू वानखेडे यांच्या अचानक जाण्याचे वानखेडे परिवारावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.