जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा चा अवमान केल्याने गांधी चौक येथे भाजपच्या वतीने केले आंदोलन..
मनात व पोटात,ओठात मनुस्मृती विचारसरणी असल्यामुळे शरद पवार गटाचे नेते व स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे स्वतःला विद्वान समजून जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न महामानव घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान महाड येथील चवदार कालव्यावर केला या घटनेमुळे राज्यभरात तीव्र आंदोलन केले जात आहे. आज अकोल्यात अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे आणि भाजपा अनुसूचित जाती आघाडी तर्फे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह गांधी रोड येथे जितेंद्र आव्हाड यांना जोडो मोरो आंदोलन केले तसेच सुप्रियाताई सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना ताबडतोब पक्षातून दूर करावे व आज कुठेही मनुस्मृती पालन होत नाही मनुस्मृती ही लोकांना माहीत नसताना जाणून बुजून मनुस्मृतीचा भूत उभा करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी असा प्रकार होत असल्याचाही आरोप अनुप धोत्रे यांनी केला.
जिल्हाभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येने सर्व समाजातील नागरिक सहभागी झाले होते