राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी शहरात भव्य शोभायात्रा…!

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी शहरात भव्य शोभायात्रा…!

शाम वाळस्कर. प्रतिनिधी मुर्तिजापूर :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी मुर्तिजापूर तालुका समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने ३१ मे २०२४ ला शुक्रवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ व्या जयंतीनिमित्त पोळा चौक जुने वस्ती मुर्तीजापुर येथे समस्त धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती चे औचित्य साधून प्रतिमेचे पूजन व पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे व जयघोष करीत भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची भुमिका साकारणार आहे कु शितोळे व मल्हारराव होळकर यांची भुमिका साकारणार आहे तांबडे यांना दोन घोड्यावर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी करून ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.वेगवेगळे सामाजिक कलात्मक समाजसुधारकांच्या प्रतिमा सजविलेले ट्रक्टरवर देखावे तर भव्य प्रतिमा सजविलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सजविलेले ट्रक्टरवर मिरवणूकीत दर्शनी भागावर सजवलेल्या रथातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा जयघोष करीत जयजयकार करून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे व पोळा चौक पासून निघालेली शोभायात्रा पुढे महाराजा चौक त्यानंतर तोलाराम चौक व मुख्य मार्गावरील स्टेशन विभागात पोहचणार आहे शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या समाजबांधवांनी शांततेने व सरळ मार्गावर शिस्तबद्ध चालायचे आहे व आपल्या शोभायात्रेचा जयंतीच्या संदेश संपूर्ण शहराला देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, शेवटी समारोपीय कार्यक्रमात सहभागी होऊन शांततेत शोभायात्रा संपल्याचे घोषित केल्यानंतर शांततेत परत जावे .या शोभायात्रेत मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व धनगर समाजातील महिला व पुरुष व बालगोपाल ही सहभागी होऊन या कार्याची शोभा वाढवणार आहे. संध्याकाळी १०.०० वाजता शोभायात्रेचा समारोप करून शांततेत समाजबांधव आप-आपल्या घरी पोहोचणार आहे.या शोभायात्रेकरीता मुर्तिजापूर शहर व तालुक्यातील संपूर्ण समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे असे समस्त धनगर समाज बांधव उत्सव समितीच्या वतीने आयोजकांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news