सिटी कोतवाली ठाण्या हद्दीतील सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला…!
घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
सिटी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सराफ गल्लीत दिनांक 1 जून रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान दोन अज्ञात युवकांनी महिलांची छेड काढून विरोध करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केला, या घटनेमुळे शहरातील मुख्य बाजार पेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान या हल्ल्याची संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
अकोला शहरातील सराफ गल्लीतून दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली असता महिलेने विरोध केला,यातील एक युवक त्या महिलेच्या दिशेने येत त्याने त्या महिलेला मारहाण केली. सोबतच्या महिलेला मारहाण होत असल्याचे पाहून दुसरी महिला सुद्धा तिच्या मदतीला धावून आली,या दरम्यान या युवकाने हातातील चाकूने वार करून ऐका महिलेला जखमी करून तेथून पळ काढला आहे , भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोला शहरातील सराफ गल्लीत 90 टक्के सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत सोन्याची दुकानं म्हटलं तर या ठिकाणी महिलांची वर्दळ जास्त असते. याचा फायदा घेत अज्ञात आरोपी महिलांचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना घडवून आणतात.
दुकानदार व महिलांच्या सुरक्षेबाबत या संकुलात ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.