अकोला शहरातील शिवणी परिसरातील एअरपोर्ट जवळ एका ट्रकला अचानक लागली आग
अकोला शहरातील शिवणी परिसरातील एअरपोर्ट जवळ एका ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याच अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दल वेळीच पोहचल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.