वृध्द महिलेवर अत्याचार; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
स्थानिक गुन्हे शाखा, बोरगाव मंजू पोलिसांची कामगिरी
बोरगाव मंजू – पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोळंबी येथील एक ७० वर्षीय वृध्द महिला गावाच्या फाट्यावरुन आपल्या घरी जात असताना वाटेतच एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने वृध्द महिलेवर अत्याचार केल्याची घटना २८ मे मंगळवार रोजी घडली होती, घटनेनंतर सदर अज्ञात आरोपी पसार झाले होते, बोरगाव मंजू पोलिसांनी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये तिन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता, दरम्यान सदर अज्ञात आरोपिची बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला यांनी अखेर चार दिवसांनंतर दिनांक 2 जून रोजी सदर घटनेतील आरोपीस बेड्या ठोकल्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिलेने बोरगाव मंजू पोलिसात फिर्याद दिली होती की गावाच्या फाट्यावरुन वृध्द महिला आपल्या घरी जात असताना, एका दुचाकीवरून तीन इसम आले होते, त्यातील अज्ञात एकाने वृध्द महिलेस नजीकच्या शेतात नेऊन अत्याचार केला,व पसार झाला होता अशी फिर्याद दिली होती, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून. वेगवेगळ्या पोलिस पथक तयार करून गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती वरून आरोपी राहुल अर्जुन मोरे वय २४ रा शेलोडी जिल्हा बुलढाणा यास घटनेतील दुचाकी सह ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या, पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली, पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके सह पोलीस करत आहेत. बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांना केली यशस्वी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलिस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, बोरगाव मंजू पोलिस निरीक्षक मनोज केदारे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक सतीष सपकाळ, हेडकॉन्स्टेबल अरुण गोपनारायण, योगेश काटकर, गिरीश विर, सचिन सोनटक्के, सुदिप राऊत, संदिप पवार, स्थानिक शाखेचे पोलिस कर्मचारी अविनाश पाचपोर,रवि खंडारे, अब्दुल माजिद,वसीम शेख, सायबर सेलचे प्रशांत केदारे, गोपाल ठोंबरे, गोविंद कुलकर्णी, यांनी यशस्वी कारवाई केली