वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण
अकोला शहरातील पूर्वेकडील नूतन वास्तू असलेले खडकी परिसरातील चांदुर ग्रामपंचायत हद्दीत वसलेले बंगले डुप्लेक्स अपार्टमेंट आणि घरांचा विद्युत पुरवठा तब्बल 17 तास बंद होता,
यामध्ये आनंद वाटिका 32 बंगलो निसर्ग गार्डन सोसायटी डेबू सेफ्टी टॅंक परिसर व इतर चार ते पाच कॉलनीमधील विद्युत पुरवठा रात्री तब्बल दोन वाजता पासून खंडित होता यामुळे नागरिकांचे आबालवृद्धांचे व लहान मुलांचे हाल झाले आधीच उकाड्याचे दिवस असल्याने लहान थोरांना उन्हाचा व गर्मीचा त्रास होतो अशाच विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झाल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला, महावितरण कडून कुठल्याच प्रकारे सहकार्य करून विद्युत पुरवठा पूर्ववत कधी होईल याची माहिती देण्यात आली नाही विद्युत सहाय्यकास भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्याने भ्रमणध्वनी उचलण्याची तसदी घेतली नाही आणि अभियंता तर सोडाच अभियंताला ग्राहकाचा काही एक देणं घेणं नाही आहे अभियंता सदर भागांमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉल्ट झाल्यास फिरकत सुद्धा नाही यामुळे महावितरण कंपनीची प्रतिमा ग्राहकांच्या नजरेत मलीन होत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत महावितरण कडून त्यांच्या अभियंत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिक निराश झाले आहेत, या परिसरामध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होत असतो शेवटी संध्याकाळी सात वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाला आता महावितरण कुठल्या प्रकारची कारवाई आपल्या अभियंता आणि कर्मचाऱ्यावर करते याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे