वृक्ष लागवडीत त भ्रष्टाचार प्रकरण!
पातुर पंचायत समिती अंतर्गत नरेगाच्या वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असताना याबाबत अनेक तक्रारीही झाल्या असताना या विषयाला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक 22 मे 2024 रोजी जोर आला आणि वृक्ष लागवडीत भ्रष्टाचाराचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत जोरदार गाजला या विषयाबाबत जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी जोरदार खडा जंगी केली होती त्यानंतर याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्वरित चौकशी नेमण्याचे आदेश दिले होते सदर विभागाच्या अनेक तक्रारी क्षेत्राफिने मॅनेज करण्यात आल्या होत्या परंतु गत काही दिवसाआधी मंगेश हरिदास धोत्रे राहणार दिग्रस बुद्रुक यांनी पात्र पंचायत समिती तथा जिल्हा परिषद अकोला येथील सर तक्रार दिली होती सात ते आठ ग्रामपंचायतीचे नावे सदर चौकशीमध्ये आहेत सदर चौकशी समितीमध्ये
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्ष जिल्हा परिषद अकोला यांनी काढलेल्या पत्रानुसार श्रीमती जयश्री वाघमारे गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोला ह्या अध्यक्ष असून श्रीमती रोहिणी मोघाड कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला या सचिव असून श्री उमेश निखाडे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पंचायत समिती अकोला सदस्य असून श्री ऋषिकेश चौधरी तांत्रिक अधिकारी कृषी पंचायत समिती अकोट सदस्य तर श्रीमती ज्योती वाहूर वाघ डाटा एन्ट्री ऑपरेटर पंचायत समिती अकोला या सदस्य असून एकूण पाच सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली असून सन 2023 24 मध्ये पातुर तालुक्यामध्ये करण्यात आलेले वृक्ष लागवड वृक्ष संगोपन कामाची तपासणी करणे करिता सदर चौकशी समिती नेमण्यात आली आहे