राज्यातून मंत्रिपदासाठी ‘या’ 6 खासदारांना फोन

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत साधारण ४० जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यामध्ये लोकसभेत विजयी झालेले नवनिर्वाचित खासदारांना देखील मंत्रिपदासाठी फोन येण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांना पंतप्रधान कार्यालयातून थेट फोन गेले असून यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. तर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांना ११. ३० वाजता चहापानासाठी बोलावलं आहे. तर देशीतील विविध प्रांत, जाती, धर्म, समूह, यासह आगामी राज्यातील निवडणुका लक्षात घेता नव्या मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यासह देशातील अमित शाह, राजनाथ सिंह, एस जयशंकर. प्रल्हाद जोशी, जयंत चौधरी, जीतनराम मांझी, रामनाथ ठाकुर, चिराग पासवान, एच डी कुमारस्वामी, ज्योतिरादित्य सिंधिया, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह, किरेन रिजुजु, राव इंद्रजीत सिंह, शांतनु ठाकुर, मनसुख मांडविया, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंह पुरी, बी एल वर्मा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेकांना केंद्रातून फोन आल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news