देशाच्या राजकारणातील सध्याच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर आता सूत्रांकडून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ते विकास आणि परिवहन खातं देण्यात आलं आहे. अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. तर राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्री देण्यात आलं आहे. तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आलं आहे.
मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं.
त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे.
बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी
बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हे खातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
मोदी 3.O मध्ये कुणाला कोणती जबादारी ?
राजनाथ सिंह – संरक्षणमंत्री
अमित शाह – गृहमंत्री
एस. जयशंकर – परराष्ट्रमंत्री
निर्मला सीतारमण – अर्थमंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि दळणवळमंत्री
चिराग पासवान – क्रीडा, युवक कल्याण आणि अन्न प्रक्रियामंत्री
शिवराज सिंह चौहान – कृषी, ग्रामीण विकास, पंचायत राजमंत्री
मनोहरलाल खट्टर – ऊर्जामंत्री
जीतनराम मांझी – MSME मंत्री
राममोहन नायडू – नागरी उड्डाणमंत्री
भूपेंद्र यादव – पर्यावरणमंत्री
गजेंद्र शेखावत – संस्कृती आणि पर्यटनमंत्री
सीआर पाटील – जलशक्ती मंत्री
किरेन रिजिजू – संसदीय कामकाजमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षणमंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योगमंत्री
जेपी नड्डा – आरोग्यमंत्री
प्रल्हाद जोशी – अन्न, ग्राहक व्यवहार आणि अक्षय ऊर्जामंत्री
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियममंत्री
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बालविकासमंत्री
ज्योतिरादित्य सिंदिया – टेलिकॉममंत्री
गिरीराज सिंह – टेक्सटाईलमंत्री
मनसुख मांडविया – श्रम आणि रोजगारमंत्री
पीयूष गोयल – उद्योग आणि वाणिज्यमंत्री
सर्वानंद सोनोवाल- जहाजरानीमंत्री
राजीव रंजन सिंह (लल्लन सिंह) – पंचायत राज, मत्स्यपालन, पशूपालन आणि दुग्धविकास
वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय
(सविस्तर बातमी लवकरच)