अकोला महानगरपालिका, अकोला कर वसूली विभाग

जा.क्र.अमनपा/कर/२०२४

दिनांक : ४/६/२०२४

अकोला महानगरपालिका, अकोला कर वसूली विभाग

सन २०२४-२५ मागणीचे देयके वितरित केल्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये सामान्य करात सूट देणेबाबत मालमत्ता धारकांना द्यावयाची माहिती.

जाहीर सुचना

   अकोला महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना सुचीत करण्यात येते की, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे मागणी देयके (कराचे बिल) वाटप करण्यात येत आहे. ज्या मालमत्ता धारकांना काही कारणास्त मागणीचे देयक प्राप्त झाले नाहीत. त्यांनी पुर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण झोन कार्यालयामधुन देयक प्राप्त करुन घ्यावे.

     मालमत्ताकराचा ऑनलाईन भरणा करण्याकरिता www.amcakola.in हे संकेतस्थळ कार्यान्वीत करण्यात आले आहे. तसेच सर्व कर वसुली लिपीकांकडे घरोघरी जावुन रोखीने भरणा करण्याकरीता टॅब व प्रिंटर देण्यात आले आहे. तरी आपल्या कराचा भरणा रोखीने, फोन पे, गुगल पे, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व्दारे करता येईल.

     सन २०२४-२५ या चालु वर्षाचा कराचा भरणा १४ जुन २०२४ च्या आत केल्यास सामान्य कराच्या रक्कमेत ७% सुट देण्यात येईल. १४ जुलै २०२४ च्या आत केल्यास ६% व १४ ऑगष्ट २०२४ पर्यंत भरल्यास ५% सामान्य करात सुट देण्यात येईल. तरी सर्व मालमत्ताधारकांनी थकीत व चालु मालमत्ता कराचा भरणा करुन चालु वर्षाच्या सामान्य कराच्या रकमेच्या सुटचा लाभ घ्यावा.

उपआयुक्त 

अकोला महानगरपालिका, अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news