एका हत्येने अकोला पुन्हा हादरला
अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत इराणी झोपडपट्टी बाजोरिया मैदाना जवळ खुनाची घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये अन्सार शेख सलीम शेख असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत हा न्यू बैदपुरा अकोला येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर स्थानिक गुन्हे शाखा, शहर एसडीपीओ, कोतवाली पोलीस ठाण्याचे गृह अधिकारी व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास शहर कोतवाली पोलीस करत आहेत.