वाशिम बायपास येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!
अकोला : एकीकडे अकोला शहरात हत्या व अज्ञात व्यक्तीच्या मृतदेह आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले दोन दिवसांपूर्वी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाची हत्या करण्यात या घटनेनंतर आज शुक्रवार 14 जून रोजी वाशिम बायपास पातुर रोड येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. सदर इसमाची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. सदर मृतक इसम हा अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे. सदर मृतदेहाच्या अंगावर फिकट आकाशी कलरचा शर्ट व भुरकट काळया रंगाचा पॅन्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह पुढील कारवाईसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात रवाना केला.सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान जुने शहर पोलिसांनी केले आहे. सदर इसमाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही. या इसमाचा कशाने मृत्यू झाला हे पोस्टमार्टम नंतर समोर येणार आहे. सदर इसमाचा मृत्यू झाला की घातपात करण्यात आला यासंदर्भात पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहे.