शेगावीचा राणा संतश्रेष्ठांच्या पालखीचे राज राजेश्वर नगरीत आगमन!
गण गण गणात बोते च्या गजरात दुमली राज राजेश्वर नगरी!
रोजी संत श्री गजानन महाराजांच्या आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचा राज राजेश्वर नगरीत आगमन गण गण गणात बोते त्या गजरात आगमन झाले असून श्रींच्या पालखीचे दर्शन गजानन भक्तांनी मोठ्या उत्साहात श्रींच्या पालखीचे स्वागत केले भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे रस्त्यावरती भगव्या पताका रांगोळ्या तसेच फटाक्याच्या आतिश बाजीने स्वागत करण्यात आले श्रींच्या भक्तांसाठी अल्प उपहार. थंडपेय आधी वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्रींची पालखी दोन दिवस मुक्काम असणार आहे श्रींच्या पालखीचे दर्शन गजानन भक्तांना घेता येणार आहे. शनिवारी सकाळी 9.30 ते 11.30 वाजे पर्यंत डाबकी रोड खंडेलवाल विद्यालय येथे दर्शन घेता येणार आहे तर दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत..
मुंगीलाल बाजोरिया शाळा मैदान येथे श्रींच्या पालखीचे दर्शन घेता येणार आहे.
रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी आठ ते दहा पर्यंत शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी गौरक्षण रोड येथे भाविकांना दर्शन घेता येणार असून सायंकाळी पाच ते रात्री अकरा हरिहर पेठ जुने शहर जिल्हा परिषद टाऊन शाळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे सोमवारी सकाळी ही पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे.