एका दिवसाच्या अर्भकाला फेकले नदीत!
पातूर शहरातील घटना!
स्थानिक पातुर शहरातील बाळापुर वेस लागत असलेल्या पुलाखाली एक पुरुष जातीचे अर्भक मृत स्थितीत दिसल्याने शहरात एकच खळबळ उडाली. सदर अर्भक पाहण्यासाठी बघन्यासाठी. बघ्याची एकच झुंबड उडाली पातुर शहरातील बाळापुर वेशीजवळ बोर्डी नदित एक पुरुष जातीचे नवजात अर्भकाचा नाळ गुंडाळलेला मृतदेह आढळल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या मुलाबद्दल लोकांच्या मनात जितकी सहानुभूती असते, तितकाच राग त्या मुलाच्या आईबद्दल असतो.एक आई इतकी क्रूर कशी असू शकते हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शेवटी,एक महिला एका दिवसाच्या मुलाला अशा प्रकारे मरण्यासाठी नाल्यात कसे फेकून देऊ शकते ?
स्थानीक नागरीकांनी सदर घटनेची माहिती पोलीसांना दिली.माहिती मिळताच पोलीस पथकाचे पो.उ.नि.तडसे,ठाकुर मेजर,दिलीप इंगळे,सत्यजित ठाकुर,धर्मेंद्र ठाकुर यांनी घटनास्थळ गाठून नवजात अर्भकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांनी या मुलाच्या अनोळखी पालकांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पातुर पोलीस करीत
आहेत.