विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू..!

विद्युत वाहिनीच्या खांबावर काम करत असताना युवकाचा मृत्यू..!
———————————-
प्रतिनिधी शाम वाळस्कर
सत्य लढा न्यूज मुर्तीजापुर

मूर्तिजापूर :- मुख्य विज वाहिनीच्या खांबावर चढून काम करीत असताना अचानक प्रवाह आल्याने शॉक लागून माना येथील २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील भट्टड लेआउट जवळील तुलशी नगर येथे घडली.
मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील आकाश बनसोड हा २९ वर्षीय युवक विज वितरण कंपनीच्या कामास कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शहरातील भट्टड लेआउट जवळील तुलसी नगर स्थित दुपार पासूनच काम सुरु असल्याने विद्युत खांबावर काम करीत असतांना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक वाहिनीत विद्युत प्रवाह आल्याने आकाश चा विद्युत खांबावर शॉक लागून जागीच मृत्यू झाला.


विज वितरण कंपनी च्या वतीने पावसाळ्या पूर्वीचे शहरात काम सुरु आहे. यात काही विज वितरण कंपनीचे कर्मचारी तर कॉन्ट्रॅक्टर चे कर्मचारी कार्यरत आहेत. कुठल्याही ठिकाणी विज वितरण कंपनीचे काम सुरु असतांना मेन ट्रांसफार्मर वरून लाईन बंद करून त्या ट्रान्सफर जवळ विज वितरण कंपनीचा कर्मचारी पूर्ण काम समपेपर्यंत हजर असतो मात्र आज घडलेल्या घटनेत विज वितरण कंपनीचा एकच कर्मचारी असल्याने सदर लाईन मन हा ज्या ठिकाणी मुख्य काम सुरु होते त्याच ठिकाणी हजर होता तर ट्रांसफार्मर जवळ कुठलाही कर्मचारी नव्हता. तेथील कार्यरत लाईनमन यांनी आमच्या प्रतिनिधी नी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना त्याच्या नुसार ट्रांसफार्मर वरून विद्युत काम सुरू असल्याने मुख्य फ्युज काढण्यात आला होता मात्र सदर आलेला प्रवाह हा शहरातील पथदिव्यांचा असून त्याचे मेंटेनन्स हे नगर परिषद कडे असल्याचे सांगितले. शासनाच्या नियमानुसार कुठलाही कर्मचारी खांबावर अथवा इतरत्र विद्युतचे काम करत असल्यास त्यास वीज वितरण कंपनी अथवा कॉन्ट्रॅक्टदार कडून सेफ्टी देणे अनिवार्य असतात. परंतु सदर कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टदार कडून कुठलेही सेफ्टी न दिल्याने सदर घटना घडली असावी हे नाकारता येत नाही. मात्र या सर्वात आकाश चा कामाचा पहिला दिवसच अखेर चा ठरला. असला तरी शहरातील गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना असून विज वितरण कंपनी ही आपली जिम्मेदारीच नसल्याचे सांगून यातून पळ काढत आहे. मृत आकाश यांच्या नातेवाईकांनी जो पर्यंत जिल्हाधिकारी येथे येऊन योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासित करीत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news