अन.. मोबाईल ने खिशात अचानक पेट घेतला!
मोबाईल वापरण्यांनो सावधान
अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खिशात ठेवलेल्या फोनमधून अचानक धूर येत असल्याचं एका तरुणाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याने तत्काळ फोन खिशातून बाहेर काढला आणि रस्त्यावर फेकला. इतक्यात फोनचा स्फोट झाला. सुदैवानं यात तरुण थोडक्यात वाचला. वेळीच प्रसंगावधान राखल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. मात्र मोबाईलमुळे या तरुणाच्या पॅन्टचा खिसा पूर्णपणे जळाला होता. शंकर नामक या तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल फोन खिश्यात ठेवलेला. पण अचानक फोनमधून धूर आल्यानं तरुणालाही नेमकं काय झालंय, हे कळू शकलं नाही. मोबाईल गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, .अकोट शहरात नगरपालिकेसमोरच मोबाईलच्या स्फोटाचा थरार घडला. मोबाईल वापरा पण जपून! मोबाईल वापरताना आपला मोबाईल जर गरम होत असेल तर तो तात्काळ खिशात बाहेर काढून ठेवावा तसेच लहान मुलांना मोबाईल देत असताना तो मोबाईल गरम तर नाही ना! याची शहानिशा करूनच मोबाईल द्यावा! जर कारण मोबाईल गरम होत असल्यामुळे स्पोर्टच्या घटना घडत असून. एखाद्या मोकळ्या जागी मोबाईल ठेवावा जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही.