अतिक्रमनधारी फूटपाट व्यवसायकाने ग्राहकाला मारहाण करीत केलं जखमी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल!
अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून सामान्य नागरिकांना रस्त्यावर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. विशेष म्हणजे गांधी रोड हा रहदारीचा रस्ता असून हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण धारकांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे या अतिक्रमणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रविवार दिनांक 23 जून रोजी गांधी चौकामध्ये एका अतिक्रमण धारकाने ऐका ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे ,ऐका महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत त्या ग्राहकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे.सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांची तक्रार मेडिकल केल्यानंतर दुपारी 5 वाजता दाखल केली असून त्या ग्राहकास या मारहाणीत दोन टाके पडले आहेत.शहरातील अतिक्रमण धारकांची दादागिरी वाढत चालली असून मनपा अतिक्रमण विभाग फक्त पगार घेण्यापुरता आहे का असा प्रश्न उपस्थित झाला असून ही अतिक्रमणे तात्काळ काढण्याची कारवाई सुरू करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.